छत्रपती संभाजीनगर 24 मे 2026 (एस.के.शेख महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेचा विचार करून समाजसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सुदाम तांदळे पाटील यांनी आपल्या स्वखर्चातून गावात “शितल जल पाव पानपोई” उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत गावातील नागरिक तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. उन्हामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. सुदाम तांदळे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“मदत करण्यासाठी संपत्तीपेक्षा माणुसकीची गरज असते,” हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने गरजू आणि सर्वसामान्य लोकांसाठी पुढाकार घेतला तर समाज अधिक संवेदनशील आणि सशक्त होऊ शकतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
गणोरी येथे समाजसेवक सुदाम तांदळे पाटील यांच्याकडून शितल जल पानपोई उपक्रम
Related Posts
Add A Comment

