छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक, गोमांस विक्री आणि जनावरांच्या तस्करीविरोधात मोठी धडक मोहीम राबवत मोठे यश संपादन केले आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व मा. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ मे २०२६ पासून जिल्हाभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान वैजापूर, फुलंब्री, वडोद बाजार, करमाड, फर्दापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड ग्रामीण, कन्नड ग्रामीण आणि खुलताबाद पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाया करत अवैध धंद्यांवर मोठा आळा घातला.
मोठी आकडेवारी समोर
▪️ १२ गुन्हे दाखल
▪️ १८ आरोपींवर कारवाई
▪️ ५१ गोवंश जनावरांची सुटका
▪️ ८६५ किलो गोमांस जप्त
▪️ ११ वाहने जप्त
▪️ एकूण मुद्देमाल किंमत तब्बल ₹३७.९३ लाख
कत्तलखान्यांवर धाडी
ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या १२ जनावरांची सुटका केली. तसेच गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करण्यात आली.
अवैध वाहतुकीवर मोठा प्रहार
छुप्या मार्गाने होणारी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक पोलिसांनी उधळून लावत ३९ गोवंश जनावरे सुरक्षितपणे मुक्त केली. संबंधित जनावरांना पुढील संगोपनासाठी अधिकृत गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
RTO मार्फतही कारवाईची तयारी
जप्त करण्यात आलेल्या सर्व वाहनांचे परवाने आणि चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी RTO कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर गोवंश वाहतूक, गोमांस विक्री किंवा कत्तल सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ‘डायल 112’ किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
बकरी ईदपूर्वी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! १२ गुन्हे दाखल • १८ आरोपींवर कारवाई • तब्बल ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Related Posts
Add A Comment

