छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात भूमिका जाहीर करावी या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने 25 मे सोमवारी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे राज्य शासनाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दोन जातीमध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले आहे रचले आहे उपवर्गीकरण होऊ नये यासाठी आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे उपवर्गीकरणाच्या विरोधात शहरांमध्ये धरणे निदर्शने मोर्चे असे आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले आहे असे असताना सुद्धा पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही वास्तव पाहता ते राखीव मतदार संघातून निवडून आले आहे त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणात विरोधात कोणतीही भूमिका घेतली नाही त्यामुळे त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी सोबतच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण तात्काळ रद्द करावे न्यायमूर्ती अनंत बाजार समितीचा अहवाल जाहीर करावा आधी मागण्यासाठी आजा समाज पार्टीचे प्रदेश महासचिव तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 25 मे रोजी सकाळी 11 वाजता कांचनवाडी चौक पैठण लिंक रोडवरील संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा नेण्यात येणार आहे या मोर्चाला आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आजा समाज पार्टीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांनी केले आहे

