छत्रपती संभाजीनगर 23 में 2026: (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)शहरासह वेरूळ, ढोरेगाव आणि परिसरातील अनेक भागांत आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.
🌧️ शहरातील अनेक भागांत जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक भागांमध्ये धुळीचे लोट उडताना दिसून आले.
संभाजीनगर शहरातील काही परिसरात वीज खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. दरम्यान, पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामानातील अचानक बदलामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, तसेच झाडे व विद्युत खांबांपासून सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसाची दमदार सुरुवात
Related Posts
Add A Comment

