छत्रपती संभाजीनगर, दि.22 (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) : कृषि विभागाच्या आयुक्तालय स्तरावर कृषि निविष्ठांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 9421233270 तसेच कृषि आयुक्तालय पुणे यांच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 असा आहे.
वरीलप्रमाणे संपर्क क्रमांकावर शेतकऱ्यांनी निविष्ठांच्या उपलब्धते बाबत तसेच अडचणी, तक्रारी बाबत संपर्क करावा व अडचणी तक्रारीचे निराकरण करण्यात यावे असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक छत्रपती संभाजीनगर सुनिल वानखेडे यांनी केले आहे.

