खुलताबाद पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला; पोलीस ठाण्यात मोठी गर्दी
खुलताबाद, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – वेरूळ परिसरात गोवंश वाहतूक करणारी एक संशयित गाडी गोरक्षकांनी पकडल्याची घटना समोर आली असून यावेळी गोरक्षक आणि वाहन चालकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर संबंधित वाहन अडवण्यात आले. यावेळी वाहन चालक आणि गोरक्षक यांच्यात जोरदार वाद झाला व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून संबंधित वाहन पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेनंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात नागरिक व गोरक्षकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून गोवंश वाहतुकीबाबत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून पोलिस तपासानंतरच संपूर्ण घटनेचे वास्तव स्पष्ट होणार आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वेरूळजवळ गोवंश वाहतूक करणारी गाडी पकडली; गोरक्षक आणि चालकांमध्ये तुफान हाणामारी
Related Posts
Add A Comment

