छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – गायीला भारतीय संस्कृतीत माता मानले जाते. सनातन धर्मात गोरक्षणाला विशेष महत्त्व असून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गोवंशाचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे.
ग्रामीण पोलिस प्रशासनाने अवैध गोवंश वाहतूक, गोतस्करी व बेकायदेशीर कत्तलखाने रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. संशयास्पद वाहने, गोतस्करी अथवा अवैध कत्तलखान्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा हातात न घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस प्रशासन, परिवहन विभाग व पशुसंवर्धन विभाग संयुक्तपणे कार्यरत असून गोतस्करी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “सजग नागरिक – सुरक्षित समाज” या संदेशातून समाजातील प्रत्येक घटकाने कायद्याचा सन्मान करत गोरक्षणासाठी सहकार्य करावे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
सनातन धर्माची परंपरा आणि भारतीय संस्कृती जपण्यासाठी गायीचे संरक्षण आवश्यक असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखून गोवंश संरक्षणासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अवैध प्रकारांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
गोरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे जनतेला आवाहन
Related Posts
Add A Comment

