शिऊर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला असून सकाळी साडेआठ वाजता ओपीडी सुरू होणे अपेक्षित असताना तब्बल ९.३७ वाजेपर्यंत आरोग्य केंद्राला कुलूपच असल्याचे दिसून आले. यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
विशेष म्हणजे, एक जखमी रुग्ण सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर वेदनांनी तडफडत पडलेला होता. संबंधित रुग्णाला बोलताही येत नसल्याची माहिती तेथे उपस्थित महिलांनी दिली. डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णाला तातडीची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये वेळ स्पष्टपणे दिसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी मागील दोन वर्षांपासून सुरू असून वेळेवर डॉक्टर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“रुग्ण जखमी अवस्थेत वेदना सहन करत पडलेला असताना डॉक्टर अनुपस्थित असणे अत्यंत गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत रुग्णाचे काही बरे-वाईट झाल्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या प्रकाराची आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत व वेळेवर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार; जखमी रुग्ण उपचाराविना ताटकळत
Related Posts
Add A Comment

