छत्रपती संभाजीनगर 21 मे 2026 (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखला जात असला तरी मध्यवर्ती बस स्थानकाची दुरवस्था समोर येत आहे. बस स्थानक परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून प्रवासी व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. बस ये-जा करताना धुळीचे साम्राज्य निर्माण होत असून नागरिकांना तोंड झाकून उभे राहण्याची वेळ येत आहे. तसेच जुने बस स्थानक असल्याने स्लॅबच्या खपल्या निघालेल्या दिसून येत आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांपुढे शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बस स्थानकातील रस्ते व इतर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

