छत्रपती संभाजीनगर : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक पूर्वतयारी पूर्ण ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.
विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. नालेसफाई, पूरप्रवण गावांची तयारी, धोकादायक इमारतींची पाहणी, रस्ते-पूल दुरुस्ती आणि जलनिस्सारण यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला.
तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष पथके सज्ज ठेवणे, साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने औषधसाठा उपलब्ध ठेवणे आणि जिल्हास्तरावर २४x७ नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
‘दामिनी’ व ‘सचेत’ अॅपद्वारे विजेपासून बचावाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना हवामान आधारित मार्गदर्शन देण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले. प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना वेळेवर मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश
Related Posts
Add A Comment

