छत्रपती संभाजीनगर
दि. २१ मे महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या लेखा विभागातील लिपिक अभिषेक सुनील ढेकळे यांच्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ मनपाच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मनपा ठेकेदार मुबारक मेहबूब पठाण यांनी त्यांच्या बिलासंदर्भातील फाईलबाबत विचारणा करताना लेखा विभागातील कर्मचारी अभिषेक ढेकळे यांना शिवीगाळ करून थप्पड मारल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेमुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, कामकाजादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी व दबावाचा सामना करावा लागत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने मा. आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात संबंधित ठेकेदाराविरुद्ध तातडीने कारवाई करावी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना मा. आयुक्तांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करत, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवून शांततापूर्ण पद्धतीने आपापले नियमित कामकाज सुरू ठेवले. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने कायदेशीर व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी लेखा विभागातील कर्मचारी अभिषेक ढेकळे,बहुजन कामगार शक्ती महासंघ अध्यक्ष संजय रगडे,लेखाधिकारी संजय कोलते, महेश दुबे, काम्रान फरहाद ,तीर्थराज धोपे, अजय दिडोरे, सतीश सौर ,अविनाश निकम,जितेंद्र खराडकर, अतुल बनकर,सय्यद कासम, ललित कापसे, ईश्वर कामेकर, प्रशांत हिसवणकर, पंदारे मॅडम मनीषा न्यायधीश, रुपाली शेळके पूनम क्षीरसागर विकास शिंदे, एस बाबर यांच्या सह मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला, काळया फिती लावून कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Related Posts
Add A Comment

