वैजापूर प्रतिनिधी – वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील पारेश्वर के.एस.के. इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना जबरदस्तीने अतिरिक्त वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल पंपावर कमीत कमी 500 रुपयांचे पेट्रोल घेण्याची सक्ती केली जात आहे. कमी रकमेचे पेट्रोल मागणाऱ्या ग्राहकांना पंपाबाहेर पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, 2 हजार रुपयांचे डिझेल घेतल्यास त्यासोबत सुमारे 450 रुपयांचा एक लिटर ऑईल डबा घेणे बंधनकारक करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. “2000 रुपयांचे डिझेल आणि 450 रुपयांचा ऑईल डबा घेणे हा काही नियम आहे का?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
सदर प्रकारामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, बियाणे, खत, डिझेल व इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच अशा प्रकारे पेट्रोल पंपावर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
याशिवाय ग्रामीण भागात मजूर टंचाईही गंभीर बनत चालल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांमुळे शेतीमजुरीसाठी महिला उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे करणे कठीण झाल्याची खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या सर्व प्रकरणाची संबंधित तेल कंपनी तसेच प्रशासनाने दखल घेऊन चौकशी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.