छत्रपती संभाजीनगर दि. २१ मे (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
देशाच्या अहिंसा, शांतता आणि सहिष्णुतेच्या महान परंपरेप्रती दृढ निष्ठा व्यक्त करत सर्व प्रकारच्या दहशतवाद व हिंसाचाराचा सर्व शक्तिनिशी सामना करण्याचा निर्धार आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आला. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रतिज्ञा घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
यावेळी मा. महापौर समीर राजुरकर, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता संजय कोंबडे, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला भामरे तसेच उपआयुक्त लाखिचंद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात मा. महापौर समीर राजुरकर यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञेचे वाचन केले. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञेची पुनरावृत्ती करत देशाच्या एकात्मता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
दहशतवाद आणि हिंसाचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा न देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मनपा मुख्यालयातील सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समाजात शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर मनपा मुख्यालयात दहशतवाद व हिंसाचाराविरोधात एकजुटीची शपथ
Related Posts
Add A Comment

