वैजापूर प्रतिनिधी – अवैध गौणखनिज उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना तलाठी यांच्या कारला हायवा वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना वैजापूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी अमरसिंग तेजराव बावनकर (वय 42, व्यवसाय – तलाठी, साझा मांडकी, रा. खोपडा ता. तिरोडा जि. गोंदिया, सध्या रा. मांडकी ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 20 मे 2026 रोजी रात्री 12.40 वाजेच्या सुमारास जांबरखेडा ते लाखणी रोडवर निवृत्ती बारसे यांच्या शेताजवळ ही घटना घडली.
याप्रकरणी शिवनाथ विश्वनाथ लंबे (रा. जांबरखेडा ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एम.एच.20 जी.झेड.6706 क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या टाटा हायवा वाहनाचा चालक आहे.
माहितीनुसार, शिवना नदी पात्रालगतच्या गावांमध्ये अवैध गौणखनिज उपसा व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी गौणखनिज पथक गस्त घालत होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील हायवा वाहन फिर्यादी यांच्या दिशेने चालवत त्यांच्या एम.एच.35 ए.आर.0461 क्रमांकाच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत कार सुमारे 50 फूट फरफटत गेल्याने मोठे नुकसान झाले. तसेच फिर्यादी यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मा. सपोनि. रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
अवैध गौणखनिज वाहतूक रोखताना तलाठीच्या कारला हायवाची धडक; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Related Posts
Add A Comment

