छत्रपती संभाजीनगर – गरवारे कम्युनिटी सेंटरच्या 33 व्या स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून “खाद्य भ्रमंती आनंदनगरी” तसेच विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उन्हाळी विशेष प्रशिक्षण शिबिरांतर्गत आयोजित “खाद्य भ्रमंती आनंदनगरी” हा उपक्रम बुधवार दि. 27 मे 2026 रोजी सायंकाळी 5.30 ते रात्री 9.00 या वेळेत होणार आहे. या आनंदनगरीमध्ये सहभागी विद्यार्थी विविध खाद्यपदार्थ तसेच खेळांचे स्टॉल लावणार आहेत. स्टॉल लावू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तसेच सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून “खाद्य भ्रमंती आनंदनगरी”चा आनंद घ्यावा व मुलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर स्थापना दिनानिमित्त विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शनिवार दि. 30 मे 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भरतनाट्यम व सिनेनृत्य विभागातील विद्यार्थी आकर्षक नृत्य सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, बी-1 सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.


