advt
छत्रपती संभाजीनगर : भारताच्या राष्ट्रपतींच्या संभाजीनगर दौऱ्यादरम्यान तसेच सन 2025-26 मधील सार्वत्रिक जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उत्कृष्ट सुरक्षा व बंदोबस्त नियोजनाबद्दल पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार, मा. राष्ट्रपती यांच्या 25 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या संभाजीनगर दौऱ्यासाठी तसेच मुख्यमंत्री व इतर मंत्रीमहोदयांच्या दौऱ्यांदरम्यान आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना आणि बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते.
यामध्ये संबंधित विभागांशी समन्वय साधून मनुष्यबळाचे योग्य नियोजन, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, संवेदनशील ठिकाणांची पाहणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना प्रभावीपणे अंमलात आणण्यात आल्या. संपूर्ण बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत दक्षतेने पार पडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सुरक्षा शाखा, छत्रपती संभाजीनगर (शहर) येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि भविष्यातही अशाच प्रकारे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पोलीस आयुक्त मा. श्री. प्रविण पवार यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

