छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेणुका नगर परिसरातील जानकी हॉटेल जवळ असलेल्या कपड्याच्या स्टोअर रूमला मंगळवारी (दि. 20 मे) सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
ही घटना सायंकाळी 7:17 वाजण्याच्या सुमारास घडली. आग कपड्यांच्या स्टोअर रूममध्ये लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग इतर ठिकाणी पसरण्यापासून रोखण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण बचाव मोहीम राबविण्यात आली. उप अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. संजय कुलकर्णी, श्री. विनायक कदम आणि श्री. विजय राठोड यांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
ड्युटी अधिकारी श्री. चेतन तरोळे तसेच अग्निशामक जवान श्री. अशोक वेलदोडे, श्री. योगेश दुधे, श्री. अब्दुल वासे, श्री. आप्पासाहेब गायकवाड, श्री. मुजफ्फर आणि श्री. जगदीश गायकवाड यांनी आग विझवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
वाहन चालक श्री. नंदकुमार घुगे, श्री. सतीश शेळके, श्री. दीपक वरटे आणि श्री. सईद यांनीही तत्परतेने अग्निशमन वाहने घटनास्थळी पोहोचवून बचावकार्यात मोलाचे योगदान दिले.