छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) – राज्य शासनाकडून परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने गुरुवार दि. 21 मे 2026 रोजी राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयातील परिचारिकांनीही आंदोलनाचा इशारा दिला असून सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत परिचारिका वस्तीगृह परिसर, घाटी रुग्णालय येथे एक तास तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार नाईट ड्युटी, इव्हनिंग ड्युटी तसेच सुट्टीवर असलेल्या सर्व परिचारिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे.
परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्यांमुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला असून शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.
📍 दिनांक : 21 मे 2026
🕢 वेळ : सकाळी 7.30 ते 8.30
📌 स्थळ : परिचारिका वस्तीगृह परिसर, घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय बदल्यांविरोधात घाटीतील परिचारिकांचा उद्या तीव्र आंदोलनाचा इशारा
Related Posts
Add A Comment

