Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»सुखना नदी काठावर 25 अतिक्रमण जमीनदोस्त
छत्रपती संभाजीनगर

सुखना नदी काठावर 25 अतिक्रमण जमीनदोस्त

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मनपा, दि. 20 मे : महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार तसेच अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे आणि उपआयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोतीवाला कॉलनी, चिखलठाणा येथील सुखना नदीच्या काठावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली. नदीकाठावरील अतिक्रमणे हटविणे ही केवळ प्रशासकीय कारवाई नसून नदीचे अस्तित्व, पर्यावरणीय समतोल आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सुखना नदी ही शहराच्या नैसर्गिक जलनिस्सारण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून नदीपात्र आणि नदीकाठावरील अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह बाधित होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. तसेच नदीकिनारी अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्यास राहणे हे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे ठरू शकते. मुसळधार पावसाच्या काळात नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यास जीवित व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठ अतिक्रमणमुक्त ठेवणे ही काळाची गरज असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले.
सुखना नदीच्या काठावरील अतिक्रमण धारकांना बांधकाम काढून घेण्याबाबत महानगरपालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. या कारवाईत एकूण 32 अतिक्रमण धारकांचा समावेश होता. त्यापैकी काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविले, तर उर्वरित 25 अतिक्रमण धारकांची बांधकामे महानगरपालिकेकडून निष्कासित करण्यात आली. या कारवाईमध्ये नदीकाठावर उभारण्यात आलेल्या दोन मजली जिमच्या बांधकामाचाही समावेश होता.
नदीपात्र आणि नदीकाठावरील अतिक्रमणे हटवून नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवणे, पूराचा धोका कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे या उद्देशाने महानगरपालिका अशा कारवाया पुढेही सातत्याने करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
सदर कारवाईसाठी झोन क्रमांक 6 चे पदनिर्देशित अधिकारी निलेश पाटणी, इमारत निरीक्षक गणेश वीर, देसाई, सागर तसेच अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.