छत्रपती संभाजीनगर
दि.१९ मे महाराष्ट्र न्यूज टाइम्स
मा.आयुक्त श्री अमोल येडगे यांच्या आदेशानुसार मनपा प्रियदर्शनी शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री संजीव सोनार यांचे कडे प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.
तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा बेगमपुरा मुख्याध्यापक श्री.विजय कोल्हे यांचे कडे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार व केंद्रीय शाळा किराडपुरा न.०१ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रईसा बेगम अयुब खान यांचे कडे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.
आज मा.अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,उपआयुक्त अंकुश पांढरे, भारत तीनगोटे शिक्षणाधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी, यांनी तिन्ही अधिकारी यांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

