छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत व मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, तालुकाध्यक्ष, विविध फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर आंदोलन बुधवार दि. २० मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील व जिल्हाकार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकजूट दाखवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
Related Posts
Add A Comment

