छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून संस्था चालकांच्या खाजगी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या घरी वैयक्तिक कामे करून घेतली जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत संबंधित प्रकार थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक अथवा कर्मचारी हे संस्था चालकांच्या खाजगी व्यवसायाच्या ठिकाणी, कार्यालयात किंवा घरगुती काम करताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक), छत्रपती संभाजीनगर यांनी दिला आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे तसेच शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवावे, असे आवाहनही शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शिक्षकावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार.
Related Posts
Add A Comment

