( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शाळांच्या सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या नियोजनानुसार राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सोमवार दि.१५ जून २०२६ पासून सुरू होणार आहे.
जिल्हा परिषद पुणे यांच्या परिपत्रकानुसार प्रथम सत्र १५ जून २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहणार असून, दिवाळी सुट्टी २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान असणार आहे. त्यानंतर दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे.
तसेच उन्हाळी सुट्टी ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ दरम्यान जाहीर करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून २०२७ पासून सुरू होणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या शैक्षणिक वर्षात विविध सण, राष्ट्रीय दिवस तसेच सार्वजनिक सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला असून, शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार काही सुट्ट्यांमध्ये बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र एकूण सुट्ट्यांची संख्या शासनाच्या नियमानुसार मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अधिकृत सुट्टी वेळापत्रकानुसार नियोजन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शाळेच्या सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.
Related Posts
Add A Comment

