छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – देवगाव रंगारी येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या प्रधान तंत्र अधिकाऱ्याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप जयराम शिंदे (वय ३७), प्रधान तंत्र, महावितरण कंपनी, देवगाव रंगारी यांनी तक्रारदाराच्या कृषी पंप वीज योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सौर कृषी पंपाच्या फाईलवर कार्यवाही करण्यासाठी एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणीनंतर आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवारी शासकीय पंचांसमक्ष आरोपीला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगर, पोलीस उपअधीक्षक राजीव तेलकदर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक भास्कर नवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या प्रधान तंत्र अधिकाऱ्याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
Related Posts
Add A Comment

