छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – राज्यभरात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागातही इंधन उपलब्धतेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरातील काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत असून, “इंधन संपणार का?” अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी डिझेल उपलब्धतेत अडचणी येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे शेतकरी, वाहनचालक तसेच व्यावसायिक वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, शासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत राज्यभरातील पेट्रोल पंप तसेच गॅस एजन्सींची तपासणी मोहीम हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी किंवा नागरिकांची दिशाभूल होऊ नये यासाठी संबंधित विभागांकडून तपासणी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
राज्यभरात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
Related Posts
Add A Comment

