मुंबई,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – आपल्या कडक प्रशासनशैली आणि प्रामाणिक कारभारासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची तब्बल २५ वेळा बदली झाल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असताना त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी नागपूर महानगरपालिका, परिवहन विभाग, आरोग्य विभाग तसेच इतर अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये कार्य करताना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे अन्न व औषध प्रशासन विभागात अधिक पारदर्शकता आणि कडक अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयानंतर प्रशासनिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, तुकाराम मुंढे यांच्या नव्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली; 21 वर्षात 25 वेळेस बदली.
Related Posts
Add A Comment

