छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – औषध विक्रेत्यांच्या संघटनेने बुधवार दि.२० मे रोजी एक दिवसीय बंद पुकारला असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विभागनिहाय नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. बंदच्या कालावधीत अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त (औषधे) वि.वि. नांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित औषधे घेणाऱ्या रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभागनिहाय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे –
▪️ छत्रपती संभाजीनगर – शा. ना. साळे : 8983290162, वि.वि. नांगरे : 7387561343, म.भा. पैठणे : 9021899018
▪️ जालना – जी.द. जाधव : 8379016068
▪️ परभणी – ना.सी. भालेराव : 9405783636
▪️ हिंगोली – ना.सी. भालेराव : 9405783636
▪️ बीड – मा.ज. निमसे : 9423749616
▪️ नांदेड – अ.तु. राठोड : 8369027068
▪️ धाराशिव – ब.दा. मरेवाड : 8275175232, श्रीमती स्वा.क. कुपकर : 8830801806
▪️ लातूर – ब.दा. मरेवाड : 8275175232
औषध विक्रेत्यांच्या बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसार अधिकृत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
औषध विक्रेत्यांच्या संघटनेने बुधवार दि.२० मे रोजी एक दिवसीय बंद पुकारला असून; प्रशासनाने विभागनिहाय नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे.
Related Posts
Add A Comment

