छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
जागतिक मधमाशी पालन दिनानिमित्त बुधवार दि. २० मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता संत एकनाथ रंगमंदिर सभागृह येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील मधमाशी पालक, शेतकरी तसेच मंडळाचे राज्यातील अधिकारी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मधमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन
देणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे तसेच उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Related Posts
Add A Comment

