- छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ऑनलाइन पद्धतीने औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर परिणाम होत असून, औषध वितरण व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. याच निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य विभाग सतर्क असून, औषधे उपलब्ध न झाल्यास मदतीसाठी सहायक आयुक्त वि. वि. नांगरे (7387561343), शा. ना. साळे (8983290162) किंवा औषध निरीक्षक म. भा. पैठणे (9021899018) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच अधिकृत माहिती व मार्गदर्शनासाठी नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालय तसेच महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने २० मे रोजी देशव्यापी बंद
Related Posts
Add A Comment

