छत्रपती संभाजीनगर ( महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी )
राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाची धार अधिक तीव्र होत असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना टायर जाळून सुमारे ३० मिनिटे वाहतूक रोखून धरली. कांद्याला हमीभाव द्यावा, निर्यातबंदी हटवावी तसेच शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांना समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
Related Posts
Add A Comment

