छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – शहरातील विविध भागांमध्ये एमएसईबीच्या वीज खांबांवर खासगी वाय-फाय कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या बॉक्स बसवले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे अनेक भागांमध्ये वीज खांबांवरून मोठ्या प्रमाणात केबल टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित कामगारांना एमएसईबीची अधिकृत एनओसी किंवा परवानगीबाबत विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. उलट काही ठिकाणी प्रश्न विचारताच संबंधित कामगारांनी तेथून निघून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. तसेच संबंधित कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर किंवा मालकाचा संपर्क क्रमांक देण्यासही टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकारामुळे शहरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी वीज खांबांवर खासगी कंपन्यांकडून नेमक्या कुणाच्या परवानगीने हे बॉक्स बसवले जात आहेत? संबंधित विभागाची अधिकृत मंजुरी आहे का? तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा योग्य विचार करण्यात आला आहे का? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेले हे कथित बेकायदेशीर काम तात्काळ थांबवून संबंधित वाय-फाय कंपनीची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर शहरात एमएसईबीच्या वीज खांबांवर खासगी वाय-फाय बॉक्स? नागरिकांकडून चौकशीची मागणी
Related Posts
Add A Comment

