छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवार दि. १८ मे रोजी सकाळी १२.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मक्का उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
शासनाने मक्का पिकाला प्रतिक्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा मका केवळ १२५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात असल्याचा आरोप किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने थेट हमीभावानुसार मक्का खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जालना व छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार Kalyan Kale यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या मक्का हमीभावाच्या प्रश्नावर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी अडथळा आणून “तुम्हाला बोलू देणार नाही” असे वक्तव्य केल्याचा आरोप करत किसान काँग्रेसच्या वतीने पालकमंत्र्यांचा निषेधही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे शेतकरी बांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदन आंदोलनात अनिस पटेल (सचिव, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस), महेंद्र रमंडवाल (जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस), संतोष शेजुळ (जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग), आतिश पितळे (जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग), मोइन इनामदार (अध्यक्ष अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी), अभिषेक शिंदे (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना एनएसयूआय), डॉ. अरुण शिरसाट (वरिष्ठ उपाध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी) व अनिताताई भंडारी (शहर जिल्हा महिला काँग्रेस नेत्या) उपस्थित राहणार आहेत.
स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
दिनांक: सोमवार, १८ मे २०२६
वेळ: सकाळी १२.०० वाजता
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मक्का हमीभावासाठी किसान काँग्रेसचे आंदोलन; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निषेधाची घोषणा
Related Posts
Add A Comment

