छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ NSUI च्या वतीने क्रांतीचौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन डॉ. शादाब शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले असून, खासदार डॉ. कल्याण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी NSUI पदाधिकाऱ्यांनी केली.
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, असे सांगितले. “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणारे प्रकार सहन केले जाणार नाहीत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. शादाब शेख यांनी NEET पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा दिला.
या आंदोलनात NSUI चे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ NSUI च्या वतीने क्रांतीचौक येथे तीव्र आंदोलन
Related Posts
Add A Comment

