छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर आणि आर्थिक अडचणींचा फटका आता थेट सामान्य नागरिकांच्या जीवनावर दिसून येत आहे. अशाच परिस्थितीचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य शहराजवळील एका भागात पाहायला मिळाले.
एक अत्यंत वृद्ध व्यक्ती, ज्यांना व्यवस्थित चालणे देखील कठीण होत आहे, ते डोक्यावर चुलीसाठी लाकडांचा मोठा गठ्ठा घेऊन हळूहळू चालत जाताना दिसले. वयाच्या ओझ्यामुळे पाय साथ देत नसतानाही, उदरनिर्वाहासाठी आणि घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी त्यांना हा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे.
घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीं व गॅसचा अत्यंत तुटवडा यामुळे अनेक गरीब कुटुंबांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाई याचा परिणाम थेट सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर होत असल्याचे हे वास्तववादी चित्र मानले जात आहे.
“जगण्यासाठी संघर्ष अजूनही संपलेला नाही,”
हे या वृद्ध व्यक्तीच्या चालण्यातून आणि त्यांच्या कष्टातून स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
“जगण्यासाठी संघर्ष अजूनही संपलेला नाही,”
Related Posts
Add A Comment

