छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)- महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) यांच्या वतीने येथे दि. शनिवार दि.१६ व रविवार दि.१७ जून २०२६ रोजी उत्पादक विक्रेता परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून गुरुवार दि.१४ मे रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी निर्यात व्यवसाय संधी या विषयावर दि. १४ रोजी ही कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा CMIA कॉन्फरन्स हॉल येथे होणार आहे.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत पुढील विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे :
* निर्यातसाठी उद्योगांची तयारी आणि जागतिक खरेदीदारांसमोर प्रभावी सादरीकरण
* निर्यात वित्तपुरवठा, विमा आणि जोखीम व्यवस्थापन
* निर्यात दस्तऐवजीकरण आणि लॉजिस्टिक्स
* पॅकेजिंग, परवाने आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे
* राज्य व केंद्र शासनाच्या निर्यात प्रोत्साहन योजना
कार्यशाळेचा तपशील : दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून CMIA कॉन्फरन्स हॉल, छत्रपती संभाजीनगर. इच्छुक सहभागी पुढील लिंकवर नोंदणी करू शकतात :
https://forms.cloud.microsoft/r/hr5VEDLU2p?origin=lprLink
अधिक माहितीसाठी मुकेश सामतानी (msamtani@eepcindia.net, +९१-९८२०७५२८२७) किंवा अनिल सिंह रावत (arawat@eepcindia.net, +९१-९८२०८८६७८८) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

