
छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच विविध आस्थापनांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
➤ कामगारांसाठी आवश्यक उपाययोजना
१. कामगारांना उष्णतेच्या तीव्र वेळेत विश्रांती देणे.
२. पुरेसे पिण्याचे पाणी, थंडावा मिळेल अशी विश्रांती क्षेत्रे उपलब्ध करून देणे.
३. आपत्कालीन बर्फ पॅक व उष्णता प्रतिबंधक साहित्य उपलब्ध ठेवणे.
४. आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करणे.
➤ कारखाने व खाणी व्यवस्थापनासाठी सूचना
१. सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत कामगारांना विश्रांती देणे.
२. दोन व्यक्तींच्या गटाने काम करण्याची व्यवस्था करणे.
३. इलेक्ट्रोलाइट पूरक पेय उपलब्ध करून देणे.
४. उष्णतेमुळे होणारे धोके व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करणे.
➤ विशेष लक्ष देण्याचे गट
– बांधकाम कामगार
– वीटभट्टी कामगार
– रोजंदारी मजूर
– असंघटित क्षेत्रातील कामगार
या घटकांसाठी पोस्टर, बॅनर तसेच श्रमिक चौकांवर जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
➤ ग्रामयात्रा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अतिरिक्त सूचना
१. ग्रामयात्रा, धार्मिक व सांस्कृतिक मिरवणुकांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.
२. कार्यक्रमांचे वेळापत्रक दुपारच्या तीव्र उन्हाळी वेळेत बदलण्याचा विचार करणे.
३. नागरिकांसाठी ‘कूलिंग एरिया’ उभारणे.
४. पुरेसे पिण्याचे पाणी व इलेक्ट्रोलाइट पेय उपलब्ध ठेवणे.
५. घोषणाबाजी, पत्रके व माहिती फलकांच्या माध्यमातून जनजागृती करणे.
प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, उन्हाळ्यामध्ये उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या शासकीय रुग्णालय किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
➤ मदत / संपर्क कक्ष
• जिल्हाधिकारी कार्यालय – ०२४०-२३३१०७७
• जिल्हा रुग्णालय (जिल्हा शल्य चिकित्सक) – ०२४०-२९९४१५५
• जिल्हा आरोग्य अधिकारी – ९४२१८७७५६८
• GMCH – ०२४०-२४०२४०१
• CSMC – ८९५६३०६००७

