छत्रपती संभाजीनगर, दि.१२(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)- जिल्ह्यात अंमलीपदार्थांना प्रतिबंध करण्यासाठी लक्षीत गटांमध्ये जनजागृती व प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई वर भर द्या,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे विभागीय अधिकारी भामरे, अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे पोलीस निरीक्स्हक सचिन काळे, उपअधीक्षक गृह लोहमार्ग पोलीस संजय लोकहरे, डॉ. महेश लड्डा, उपविभागीय अधिकारी सिल्लोड पठाण तसेच अन्य अधिकारी आदी उपस्थित होते.
अंमली पदार्थाच्या विळख्यात प्रामुख्याने तरुण, विद्यार्थी वर्ग सापडतो. त्यांचे प्रबोधन करता यावे यासाठी शिक्षण विभाग, शाळा महाविद्यालये, पोलीस, आरोग्य विभागाने संयुक्त अभियान राबवावे. याच अभियानाला रस्ता सुरक्षेशी जोडावे. नशामुक्ती अभियान राबविण्यासाठी पूर्ण शैक्षणिक वर्षात कार्यक्रमांचे नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.तालुकास्तरीय यंत्रणांमार्फत विशेष पथके कार्यान्वित करुन गांजा शेतीविरोधात अभियान राबविण्याचेही निर्देश त्यांनी दिले. तसेच औषध विक्री दुकानांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्यामार्फत प्रतिबंधीत औषधांची विक्री, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी,असे निर्देशही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.
०००००
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कारवाईवर भर द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
Related Posts
Add A Comment

