छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विनयकुमार राठोड यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील कायगाव येथे मोठी कारवाई केली आहे. ‘हॉटेल जय भवानी’ येथे सुरू असलेल्या जुगार अडड्यावर छापा टाकून पोलिसांनी २२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, एकूण १४ लाख ३३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक ११/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नवीन कायगाव येथील हॉटेल जय भवानी येथे काही इसम पैशाच्या हार जीतवर जुगार खेळत आहेत. या माहितीची तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सदर ठिकाणी छापा मारण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने हॉटेल जय भवानी येथे अचानक छापा टाकला. या कारवाईत २२ इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध रित्या जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. तसेच जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा हॉटेल चालक दीपक आसाराम बोरुडे याच्यासह एकूण २३ जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे:
१) राहुल राजेंद्र वाघमारे (रा. माळीचिंचोळा), २) सागर दशरत कदम (रा. प्रवरा संगम), ३) संतोष राजाराम घुसवकर (रा. सोनई), ४) बाबासाहेब कचरू खाजेकर (रा. गंगापूर), ५) गोपीनाथ गोविंद विटेकर (रा. हंडी निमगाव), ६) राहुल विश्वास पंडीत (रा. घोडेगाव), ७) अविनाश अशोक मिसाळ (रा. अंमळनेर), ८) गोरख सुभाष हिवाळे (रा. भिवधानोरा), ९) जगन्नाथ सोनाजी दुशिंग (रा. वाळूज), १०) ज्ञानेश्वर पोपट औताडे (रा. बाभुळखेडा), ११) नितीन प्रभाकर गायकवाड (रा. प्रवरा संगम), १२) अकबर रशीद शेख (रा. कायगाव), १३) राम मारोती काळे (रा. नेवासा फाटा), १४) विश्वास दिलीप चंद्रनारायण (रा. नेवासा), १५) ज्ञानेश्वर श्रीरंग माने (रा. जामगाव), १६) गणेश कडु ठोंबरे (रा. जामगाव), १७) दत्तात्रय गोरख मगरे (रा. नेवासा), १८) सिताराम शंकर म्हस्के (रा. बंगलापुर), १९) विष्णू साहेबराव लोहगळे (रा. भिवधानोरा), २०) महेश जानकीराम ढवळे (रा. नेवासा), २१) छबु हौसीराम वाघाडीकर (रा. भेंडा), २२) नितीन बबन जगताप (रा. नेवासा) आणि २३) दीपक आसाराम बोरुडे (रा. नवीन कायगाव).
या कारवाई दरम्यान पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १४,३३,६७०/- (चौदा लाख तेहेतीस हजार सहाशे सत्तर) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली; परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती आरती पवार, श्री. विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि पवन इंगळे, पोलीस अंमलदार भागीनाथ वाघ, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल काळे व पथकाने केली आहे.

