छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त शिवव्याख्याते साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा युवकांना मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी शहरातील नामांकित उद्योजक, राजकारणी, समाजसेवक, पत्रकार, शिवप्रेमी युवक-युवती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज गायके तसेच जयंती उत्सवासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांचा भव्य कार्यक्रम
Related Posts
Add A Comment

