छत्रपती संभाजीनगर : (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)शहरातील रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप या मुख्य मार्गावर जलवाहिनी फुटल्याची घटना समोर आली असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. एका बाजूला शहरात तीव्र उष्णतेची लाट असून नागरिकांना आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी बराच वेळ पाणी रस्त्यावरून वाहत असून प्रशासनाकडून तत्काळ दुरुस्ती करण्यात आलेली नाही. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असताना अशा प्रकारच्या जलवाहिनी गळतीमुळे मौल्यवान पाण्याचा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शहरातील विविध भागांत वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे पाईपलाईन फुटत राहिल्या, तर भविष्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी चिंता पर्यावरणप्रेमी श्री भाऊराव चौरे आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनीची दुरुस्ती करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. 
श्री भाऊराव चौरे
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप मार्गावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया
Related Posts
Add A Comment

