छत्रपती संभाजीनगर,(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील कुशल युवक-युवतींना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्याकरीता महाराष्ट्र इंटरनॅशनल हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत इस्त्राईल देशात “Nursing, Healthcare” या क्षेत्रात “Home Based Caregiver” या पदाच्या ३५०० जागा उपलब्ध आहेत. या पदाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, अटी व शर्ती, निवड प्रक्रिया, मानधन व इतर फायदे इ. बाबत सविस्तर माहिती https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सदर संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी केले आहे.
अर्हता- १. इस्त्राईल देशात नोकरीसाठी उमेदवारांकडे “Home Based Caregiver” या पदासाठी आवश्यक असलेले भारतातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेद्वारा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवाइफरी या क्षेत्रातील किमान ९९० तासांचा (ऑन जॉब ट्रेनिंगसह) अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जी.डी.ए. /ए.एन.एम. /जी.एन.एम./बि.एस.सी. नर्सिंग या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्ष असावे.उंची किमान १.५ मि. आणि वजन किमान ४५ किलो असावे.
अर्ज करण्याची पद्धत-
इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पदाचे कार्यविवरण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया याबाबत माहिती घ्यावी. तसेच इच्छुक उमेदवारांनी सदर वेबपोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा या कार्यालयाच्या ०२४-२९५४८५९ या दूरध्वनी क्रमांकावर स. पावणे दहा ते सायं.सव्वा सहा या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

