छत्रपती संभाजीनगर,दि.११(महाराष्ट्र न्यूज टाइम्स
):- विमानतळावरून विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होताना वैमानिकांचे लक्ष विचलित होऊ नये आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विमानतळ परिसरातील फार्म हाऊस, मंगल कार्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स व बीम लाईट्सच्या वापरावर ५ जुलै २०२६ पर्यंत बंदी घालण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम किंवा फार्म हाऊसवरील पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर आणि बीम लाईट्सचा वापर केला जातो. या तीव्र प्रकाशझोतामुळे
वैमानिकांच्या (पायलट) दृष्टीमध्ये अडथळा निर्माण होतो.विमान उतरवताना किंवा उड्डाण करताना लक्ष विचलित होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३)अन्वये लागू करण्यात आला आहे. विमानतळाच्या १५ किलोमीटर अंतराच्या परिघांमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत .आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर किंवा मालकांवर भारतीय न्याय संहितेचे कलम १६३आणि इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल.दोषी आढळल्यास संबंधितांना शिक्षेस पात्र धरले जाईल.
विमानतळ परिसरातील सर्व मंगल कार्यालयाचे मालक, फार्म हाऊस चालक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार, यांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
विमानतळ परिसराचा १५ कि.मी.परीघ क्षेत्रात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस प्रशासनाचे आदेश
Related Posts
Add A Comment

