छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मोबाईल जप्त केला आहे.
दि. 28 मार्च 2026 रोजी वेजापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी ज्ञानेश्वर अशोक मतसागर (रा. व्यंकटेशनगर, वेजापूर) यांनी मोबाईल चोरीबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा क्रमांक 201/2026 नोंद करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक अनुपमासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी तपास सुरू केला. सुमारे 42 दिवसांच्या तपासानंतर गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी गुफरान खाजा कुरेशी (रा. परतूर, जि. जालना) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर अबुबकर उर्फ अल्तमस सायफ कुरेशी यालाही अटक करण्यात आली.
आरोपींकडून सॅमसंग कंपनीचा अंदाजे 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी वेजापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनुपमासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पो.उपनिरीक्षक महेश धुगे, कासीम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, बलबीरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तसळे आणि जीवन घोलप यांच्या पथकाने केली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई
Related Posts
Add A Comment

