Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»सेवन हिल अतिक्रमण निर्मूलन कारवाई: चुकीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर मनपा गुन्हा दाखल करणार
छत्रपती संभाजीनगर

सेवन हिल अतिक्रमण निर्मूलन कारवाई: चुकीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर मनपा गुन्हा दाखल करणार

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.10 मे : (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत सेवन हिल ते शाहनूरमिया दर्गा चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान सेवन हिल परिसरातील फ्रान्सिलियन शाळा तसेच शासकीय कार्यालयासमोरील फुटपाथवर माठ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता.
मात्र, या कारवाईची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. सदरील व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेला फुटलेले माठ उचलताना दाखवून, तिचा उदरनिर्वाह माठ विक्रीवर अवलंबून होता आणि महानगरपालिकेने तिच्यावर अन्याय केल्याचा चुकीचा संदेश प्रसारित करण्यात आला.
आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे आणि अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी श्री. संतोष वाहुळे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित दिव्यांग महिलेशी संवाद साधण्यात आला असता, तिचा माठ विक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. तिचा संबंध नसतानाही तिचा वापर करून दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे. दिव्यांग महिलेच्या बहिण व आई यांनी या चुकीच्या व्हायरल व्हिडिओ बाबत संताप देखील व्यक्त केला आहे.
सदरहू दिव्यांग महिला गजानन महाराज मंदिर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे.

दिव्यांग महिलेला मिळणार उदरनिर्वाह भत्ता
सदरहू दिव्यांग महिला गजानन महाराज मंदिर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. याची नोंद घेऊन आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी महानगरपालिकेतर्फे दिव्यांग नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या उदरनिर्वाह भत्ता योजनेत तिचे नाव समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे संबंधित महिलेला दरमहा सुमारे साडेतीन हजार रुपयांचा भत्ता मिळणार असून तिला रस्त्यावर भीक मागण्याची गरज भासणार नाही.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.