छत्रपती संभाजीनगर, दि. 11 मे: (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
जय भवानी नगर येथील नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नाल्यांची संपूर्ण सफाई करण्यात यावी, असे निर्देश मा. स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरीये यांनी आज दिले.
आज सकाळी ८ वाजता त्यांनी जय भवानी नगर ते झेंडा चौक या भागातील नाल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान जय भवानी नगर येथे नाल्यामध्ये करण्यात आलेली एक बोरवेल त्यांच्या निदर्शनास आली. ही बोरवेल नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकते, असे सांगत त्यांनी सदरील बोरवेल तात्काळ हटविण्याचे आदेश दिले.
तसेच झेंडा चौक परिसरातील नाल्याची पाहणी करताना नाल्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेली एक भिंत आढळून आली. ही भिंत त्वरित पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय नाल्याच्या उघड्या भागावर जाळ्या बसविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी सन्माननीय नगरसेवक श्री बालाजी मुंडे सन्माननीय नगरसेविका सुरेखा गायकवाड व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
मागील सोमवारी सभापती श्री. मकरीये यांनी मोती कारंजा ते संभाजी पेठ या परिसरातील नाल्यांची पाहणी करून साफसफाईचे निर्देश दिले होते. आज त्यांनी त्या कामांचाही आढावा घेतला.
मोती कारंजा येथे सुरू असलेल्या नाला सफाई कामाची पाहणी करताना काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नाल्याची हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
औषधी भवन परिसरातही सुरू असलेल्या नाला सफाई कामाची त्यांनी पाहणी केली. संबंधित दोन्ही ठिकाणांवरील कामे पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सभापती यांचे जय भवानी नगर येथे नाल्यांवरील अतिक्रमण हटवून सफाईचे निर्देश
Related Posts
Add A Comment

