छत्रपती संभाजीनगर, दि. ११ मे : (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
देशभरात जनगणनेची प्रक्रिया राबविण्यात येत असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच महानगरपालिका हद्दीतही ही प्रक्रिया सुरू आहे.
मात्र, काही शिक्षक जनगणनेचे कर्तव्य बजावण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात आज सकाळी झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.
जनगणनेसाठी आदेश प्राप्त होऊनही ड्युटीवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत असलेल्या आणि आदेशानंतरही अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
ज्या शिक्षकांना जनगणनेचे आदेश प्राप्त झाले आहेत त्यांनी तात्काळ आपल्या कर्तव्यावर रुजू होऊन संबंधित अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्त श्री. येडगे यांनी दिले आहेत. अन्यथा संबंधितांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मनपा आस्थापनेवरील कर्मचारी ज्यांनी अजूनही स्वगणना केली नाही त्यांची माहिती घेऊन त्यांची पगार कपात करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
जनगणनाचे कामात कसूर केल्यावर गुन्हा दाखल करू, आयुक्त येडगे
Related Posts
Add A Comment

