छत्रपती संभाजीनगर, दि.११ मे : (
महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
विकसित महाराष्ट्र 2047’च्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘छत्रपती संभाजीनगर 2047’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून त्यासाठी लवकरच सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन माननीय महापौर श्री. समीर राजूरकर यांनी आज केले.
आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी महापौरांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
महापौर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहराचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था आणि पाणीपुरवठा सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले की, कर वसुली ही महापालिकेची आर्थिक कणा असून ती अधिक सक्षम आणि डिजिटल करण्यासाठी जागतिक बँकेची मदत महत्त्वाची ठरू शकते. मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण दर पाच वर्षांनी होणे आवश्यक असून यासाठीही जागतिक बँकेचे सहकार्य घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट या संकल्पनेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, पदाधिकारी किंवा अधिकारी बदलले तरी या युनिटची उद्दिष्टे बदलणार नाहीत, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात येणार आहे.
शहरातील खाम आणि सुखना या दोन नद्यांमध्ये जाणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणण्यात आले आहे. यासोबतच शहरासाठी नवीन पाणीस्रोत निर्माण करण्यावरही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मित्रा संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस जागतिक बँकेचे हर्ष गोयल (वरिष्ठ जल विशेषज्ञ व संघप्रमुख), अंकुश शर्मा (वरिष्ठ वित्त विशेषज्ञ), श्रीनिवास राव पोडीपिरेड्डी (वरिष्ठ जल व स्वच्छता विशेषज्ञ), अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर 2047’ संकल्पनेसाठी सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट स्थापन होणार : महापौर समीर राजूरकर
Related Posts
Add A Comment

