छत्रपती संभाजीनगर,दि.(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती मातंग समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी गुरुवार दि.१४ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन प्रादेशिक उपायुक्त कार्यालय सभागृह, शिवाजी हायस्कूल शेजारी, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. मातंग समाजातील कार्यकर्ते, इच्छुक लाभार्थी युवक युवती यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक रमेश गोपले यांनी केले आहे.

