छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ शुक्रवार, दि. ८ मे २०२६ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “संविधान के सम्मान में | अनु.जाती मैदान में” या घोषवाक्यासह हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र गेट, आमखास मैदान येथून होणार असून मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय, डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरापर्यंत जाणार आहे.
मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे तसेच उपवर्गीकरण होईपर्यंत सरकारी कर्मचारी मेगाभरती थांबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
संघटकांच्या वतीने संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे आयोजन “अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती, छत्रपती संभाजीनगर” यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ ८ मे रोजी छत्रपती संभाजीनगरात मोर्चा
Related Posts
Add A Comment

