छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक ३ अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पात्र लाभार्थ्यांना गृहकर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
माहितीनुसार, सुंदरवाडी, पेडगाव, हर्सूल व तिसगाव येथे गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी पात्र अर्जदारांची सोडत नुकतीच काढण्यात आली असून, निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरांच्या किंमतीतून केंद्र व राज्य शासनाचे अनुदान वजा केल्यानंतर उर्वरित रकमेकरिता गृहकर्ज सुविधा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दि. ६ मे २०२६ रोजी महानगरपालिकेत यासंदर्भात बँक प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीमती कविता पिंपळे, उपआयुक्त श्रीमती अपर्णा थेतें, तसेच PMAY विभागाच्या उपअभियंता श्रीमती आरती नवगिरे यांची उपस्थिती होती.
बैठकीस स्टेट बँक ऑफ इंडिया, आवास फायनान्स, पिरामल फायनान्स, वंडर फायनान्स, स्वतंत्र फायनान्स, IIFL होम फायनान्स, ICICI बँक आणि Tyzer होम फायनान्स या बँक व वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लाभार्थ्यांना सुलभपणे गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली.
महानगरपालिकेकडून लवकरच बँक प्रतिनिधी आणि गृहकर्ज घेण्यास इच्छुक लाभार्थ्यांचा एकत्रित मेळावा आयोजित केला जाणार असून, त्यामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली गृहकर्ज सुविधा मिळणार आहे.
या उपक्रमामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घर मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गृहकर्ज सुविधा उपलब्ध
Related Posts
Add A Comment

